Dedicated Server

 

 

Shrirampur

दुर्दैवी घटना ! हौदात बुडून दोघांचा मृत्यू

Spread the love

श्रीरामपूर :-दोन मजुरांचा एका पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीरामपूर येथील औद्योगिक वसाहत परिसरात घडली आहे.

दरम्यान या दुर्दैवी घटनेत मनोजसिंग दयाशंकर सिंग (वय 35) व प्रशांत विरेश भुतळे (वय 16, दोघेही रा.धनगरवाडी) या दोघांचा मृत्यू झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रशांत हा आपल्या आईसोबत पेपरमिल परिसरात राहत होता. त्याची आई शेतमजुरीचे काम आटोपून घरी परतली.

त्यावेळी प्रशांत हा घरात नसल्याने आईने त्याचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरात रात्रीच्या सुमारास एका पेपरमिलच्या कागदी लगदा तयार केल्या जाणार्‍या हौदात प्रशांत व मनोजसिंग याचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी जमलेल्या कामगारांनी दोघांनाही हौदाबाहेर काढून येथील कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन दोघेही मृत असल्याचे घोषित केले.

त्यामुळे दोन्ही कुटुंबासह कामगार वर्गावर शोककळा पसरली. वैद्यकीय अहवालानुसार तालुका पोलिसांनी मध्यरात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close