Dedicated Server

 

 

Maharashtra

कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री
यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे.


सर्वपक्षीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. 


कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close