फातेमा हौसिंग सोसायटी मध्ये रस्त्याची समस्या कायम ; पालिकेचे दुर्लक्ष

काळ ठरणारा महामार्ग असो कि, खड्यामुळे मृत्यूचे सापळे बनलेले शहरातील अंतर्गत रस्ते. त्यातून प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय अनास्थेचे बळी सामान्य नागरिक ठरताय. वाहन चालविणे तर दूरच रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
श्रीरामपूर शहरात फातेमा हौसिंग सोसायटीत गोंधवणीकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी एका रस्त्यामध्ये अतिक्रमण केलेले असून तर दुसरा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे प्रचंड खराब झाला आहे. नागरिकांना वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे.
सबंधित रस्त्याबाबत नागरिकांनी भागातील नगरसेवक व नगरपालिका प्रशासन यांना ३ महिन्यापूर्वी वेळोवेळी अर्ज करून देखील दोन्ही रस्त्यांपैकी एकही रस्ता नागरिकांना उपलब्ध करून दिला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदरील रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भागातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला केली.