Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

उपनगराध्यक्ष यांचे बौद्धिक व राजकीय क्षमता कमी; विरोधकांची अनाधिकृत असलेली कामे पाडल्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे : राजेंद्र पवार

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर टाइम्स : नगरपरिषदेत सत्तांतर केल्यानंतर पालिकेमध्ये निस्वार्थ भावनेने लोकांचे कामे मार्गी लावण्यासाठी कुठल्याही राजकीय गटांचा विचार न करता विकास कामे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केली आहे, विरोधकांनी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली होती यासाठी शासकीय नियमांची पायमल्ली त्यांनी केली होती त्यामुळे कोट्यावधी रुपयांची ही कामे त्यांना पाडावी  लागली पालिकेच्या गोंधवणी येथील तलावातून पाणीपुरवठा होतो मात्र त्या साठवण तलावाच्या वरचा कागद,फरशा निकृष्ट केलेल्या कामामुळे निघालेल्या आहेत याबाबत विरोधक गप्प का आहेत? त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झालेले आहे तसेच जेव्हा साठवण तलावाचे कोट्यावधी रुपयांचे काम सुरू होते तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काम मंजूर होते मात्र भ्रष्टाचार करण्यासाठी सवय लागलेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तेव्हाच सुरक्षेच्या उपाययोजना का केले नाहीत ?पाण्याचे आवर्तन उशिरा आल्यामुळे जुन्या तलावातील पाणी सर्व प्रक्रिया करून वापरले शहराला करत असलेल्या पाणीपुरवठा तपासूनच करावा लागतो हे विरोधकांना कदाचित माहीत नसावे ,रोज पाण्याचा अहवाल घेतला जातो ते पिण्यासाठी योग्य असेल तरच पाणी सोडावे लागते .

LA- belle spa salon & academy

आपल्या या बगलबच्च्यांना त्या काळात अनेक अनधिकृत नळ कनेक्शन तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दिली आहेत त्यामुळे अनेक भागात कमी दाबाने पाणी येते किंवा अनधिकृत नळजोडण्या मुळे खराब पाणी येते ज्यांनी त्यांच्या काळात गावाला मैलामिश्रित पाणी पाजले या ससाणेंनी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद आहे, ज्यांनी भुयारी गटार योजना मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला त्यांना जामिनासाठी दारोदार भटकावे लागत आहे त्यांनी 25 वर्षात काय दिवे लावलेत ते सर्वसामान्य जनतेला चांगले माहिती आहे.

Shrirampur Ads

 उपनगराध्यक्ष त्यांचे बौद्धिक व राजकीय क्षमता कमी असल्याचे यावरून दिसून येते अशी शहरात चर्चा सुरू आहे तरी ही खरी आहे असे वाटते शहरात पाण्याचे नियोजन दिवंगत गोविंदराव आदिक ज.य टेकावडे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे त्यांचे फुकटचे श्रेय आपल्या कुटुंबाला  उपनगराध्यक्ष यांनी घेऊ नये समन्यायी पाणी वाटप कायदा होत असताना त्यावर रात्रीतून सह्या कुणी केल्या शहराचे व तालुक्याच्या पाण्याचे वाटोळे कोणी केले हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक वेळा भूमिका बदलणार यांना गावाची काय काळजी आहे हे जनतेस ठाऊक आहे आपली लायकी नसताना नगराध्यक्ष अनुराधा आदिकांवर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखे आहे तेव्हा उपनगराध्यक्ष यांनी इथून पुढच्या काळात आपली क्षमता पाहून बोलावे असा रोप नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केला आहे.

जाहिरात - 5

कोरोणा च्या काळामध्ये एकही दिवस घरी न थांबता जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचे काम जनता ओळखून आहे गोरगरिबांना मदत म्हणून दहा हजार कुटुंबियांना स्वखर्चातून किराणामाल देणाऱ्या तसेच आज पर्यंत मिळालेले नगराध्यक्षपदाचे सर्व मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणाऱ्या राज्यातील एकमेव नगराध्यक्ष अनुराधा आदिक आहेत त्यामुळे पुढच्या काळात पर्यटन करणाऱ्यांनी नगराध्यक्ष वर केलेले आरोप बालिश बुद्धीचे आहेत असेही राजेंद्र पवार यांनी सांगितले.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close