Dedicated Server

 

 

Shrirampur

श्रीरामपुरात तरुणावर खुनी हल्ला

Spread the love

शहरातील वॉर्ड नं. 2 नवी दिल्ली परिसरात राहणार्‍या एका तरुणावर किरकोळ वादाच्या कारणावरुन कोयत्याने खुनी

हल्ला करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला असता त्यास लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरातील वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली परिसरात राहणारा इम्रान उर्फ मुल्ला युसूफ कुरेशी याच्याबरोबर साहिल अन्वर शेख व मनोज संजय साबळे या दोघांनी काहीतरी वाद काढून इम्रान यास शिवीगाळ करुन साहिल शेख व मनोज साबळे या दोघांनी त्याच्या मानेवर व डोळ्यावर कोयत्याने वार केले. यात इम्रान हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी काल रात्री लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्यासह पोलीस दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन यातील साहिल अन्वर शेख व मनोज संजय साबळे या दोघांना ताब्यात घेतले.याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close