Dedicated Server

 

 

AhmednagarShrirampur

खळबळजनक! दगडाने ठेचून तरुणाचा खून

Spread the love

वीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री समोर आली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील इरिगेशन बंगल्याजवळ असलेल्या कॅनॉलच्या कडेला वीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली. मृत तरुण राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर येथील आदिवासी समाजाचा असून अर्जुन अनिल पवार असे त्याचे नाव आहे.

लोणी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत काही तासात व रात्रीच्यावेळी राहुरी कारखाना ते देवळाली प्रवरा रस्त्यावर पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. भिवा उर्फ विठ्ठल कैलास कावळे (वय २२) आणि दीपक विजय डोळस (वय २० ) दोघेही रा. राहुरी खुर्द अशी आरोपींची नावे आहेत.

मयत अर्जुनचे मेहुणे गोरख बर्डे रा.राहुरी खुर्द यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी व पोलीस कर्मचाऱ्यांनी काही तासात खुनाची उकल करण्यात यश मिळवले. खुनाचे कारण मात्र समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close