Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात 15 जण करोनाबाधित

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर:- तालुक्यात काल 15 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल सर्वाधिक 118 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली त्यात 5 जण पॉझिटिव्ह तर 113 निगेटीव्ह आढळून आले आहेत. खासगीत 09 तर जिल्हा रुग्णालयात 1 असे 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

LA- belle spa salon & academy

येथील एका व्यापार्‍याच्या घरातील तिघे तर दुकानातील तीन कर्मचारी तसेच विद्यमान नगरसेवक असे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगरसेवकाच्या कुटुंबातील चार जणांची तपासणी केली असता त्यात चौघेजण निगेटिव्ह आढळून आले आहेत. रॅपीड चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये हरेगाव, उंदिरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 2725 पर्यंत जावून पोहोचला आहे. काल 04 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोविड सेंटरमध्ये 21 जण उपचार घेत आहेत.

जाहिरात - 5

3 रुग्णांस दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 10058 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2725 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close