Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

सरकारला जाग आणण्यासाठी आप’चा घंटानाद आंदोलन – डेंगळे

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर – लॉक डाऊन काळातील सर्वसामान्यांची वीज बिले सरकारने माफ न केल्याच्या निषेधार्थ आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष विकास डेंगळे यांनी महावितरण कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले,कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हा पासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, या सर्वांचे दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र

LA- belle spa salon & academy

सरकारनेही विज बिल माफ करायला हवे होते सरकारने अनेकदा वीज बिल माफी संदर्भात घोषणा केल्या मात्र दिलेला शब्द अजूनही सरकार कडून पाळण्यात आला नाही,
संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला हजारो नागरिक या रोगाशी लढत आहे संपूर्ण महाराष्ट्रात लाँक डाऊन काटेकोरपणे पालन करण्यात आले देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले होते दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर वाढीव वीज बिलाचे आर्थिक संकट उभे राहिले आहे रोजगार

Shrirampur Ads

नाही शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण होत आहे महाराष्ट्र सरकारने दिल्ली सरकारच्या धर्तीवर सरसगट
100 युनिट लाईट बिल माफ करण्यात यावे या संदर्भात महावितरण कार्यालयासमोर सरकारला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही आणि वीज बिल माफ केले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे,

जाहिरात - 5

जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते प्रवीण जमदाडे,श्रीधर कराळे, भरत डेंगळे, यशवंत जेठे, गौतम राऊत, श्रीकांत महाकाळे,दीपक भोकपोडे, महेश नेहुल, दीपक परदेशी, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख, राहुल राऊत, अभिजित राऊत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close