Advertise -2

 

 

ब्रेकिंग

विराट आणि अनुष्काला कन्यारत्न

जाहिरात - Todays Offer

एका चिमुकल्या पाहुणीचे आगमन क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी झाले आहे. सोमवारी दुपारी अनुष्काने मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना विराटने ट्विट करत सांगितली.

आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या मुलीचा आज दुपारी जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी असून अनुष्का आणि मुलगी दोघी ठीक आहेत आणि आमचे हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. आम्हाला यावेळी थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असे, आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली. विराटने ऑगस्ट महिन्यात अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितल होते. आम्ही जानेवारी २०२१ पासून दोनाचे तीन होणार असल्याचे कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close