Advertise -2

 

 

ब्रेकिंग

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया समोर

जाहिरात - Todays Offer

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजित न्यायमंत्री धनंयज मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांनतर राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं अत्याचार केल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व आरोप खोटे असून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच, या महिलेसोबत परस्पर संमतीने संबंध होते. व आम्हाला दोन मुलं असल्याचाही धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मंगळवारी उशिरा रात्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तक्रार झाल्यानंतर चौकशी होणार. या आरोपांच्या चौकशीनंतर सत्य काय ते समोर येईल, असं ते म्हणाले आहेत. शिवाय, याबाबत आपण फार काही बोलू शकणार नाही,’ असेही त्यानं नमूद केलं आहे.

Shrirampur Ads

एखादी तक्रार झाली तर त्याची चौकशी होत असते. पण आरोप करणारी महिला त्यांची नातेवाईक आहे. तक्रारदाराच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांनी लग्न केलेले असून, उभयतांना दोन मुलेसुद्धा आहेत. याच्यामागे काय कारण आहे ते चौकशीत सगळे समोर येईल. त्याची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील. एखाद्या महिलेसोबत त्यांचे लग्न आधी झालेले आहे, त्यांची मुले आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल. त्यावर फार काही बोलू शकणार नाही,’ असेही नवाब मलिक म्हणाले.

जाहिरात - 5

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.

एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close