विज बिल माफी साठी आपचे चड्डी-बनियान आंदोलन

कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हा पासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, या सर्वांचे विज बिल माफ करावे या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी व बाकी सर्व विरोधी पक्ष यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला चड्डी-बनियान आंदोलन हाती घ्यावे लागले
संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे आजही आर्थिक गडी विस्कटलेली आहे उद्योग-व्यवसायात कामगारांची मोठ्या प्रमाणात कपात झाली कमी वेतनात काम करण्याचा फतवा काढला पूर्वीच्या कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होत असताना दुसरी कोरोना ची लाट येणार या धास्तीने पूर्वापार सुरू असलेल्या उद्योगांना खीळ बसली
हजारो नागरिक या मुळे धास्तावले आहे संपूर्ण महाराष्ट्रात लाँक डाऊन काटेकोरपणे पालन करण्यात आले होते देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले आहे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे रोजगार नाही शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेऊन सर सगट कोरोना काळातील विज बिल माप करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चड्डी-बनियान आंदोलन करण्यात आले यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, वक्ते प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते