श्रीरामपूर : लहू कानडे यांच्या स्थानिक आमदार निधीमधून आरोग्य केंद्रांना साहित्य प्रदान करण्यात आले.

आज आमदार लहू कानडे यांच्या स्थानिक आमदार निधीमधून Covid19 महामारीचा सामना करण्याकरीता तालुका आरोग्य अधिकारी श्रीरामपूर व राहुरी यांच्या मागणी प्रस्तावानुसार तालुक्यासाठी थर्मल गन व ऑक्सी मिटर हे साहित्य तालुका आरोग्य अधिकारी श्रीरामपूर व तालुका आरोग्य अधिकारी राहुरी यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार लहू कानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री करण ससाणे, बाजार समितीचे माजी सभापती श्री सचिन गुजर, माऊली प्रतिष्ठान चे श्री ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रांताधिकारी श्री अनिल पवार, तहसीलदार श्री प्रशांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मदने, तालुका आरोग्य अधिकारी, श्रीरामपूर श्री मोहन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी राहुरी श्रीमती विखे मॅडम व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून याकरिता आमदार लहू कानडे यांचे आभार मानण्यात आले.