भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले आहे.
पहिल्या प्रयत्नात नीरज चोप्राने फाऊल थ्रो केला. त्यामुळे त्याचा थ्रो काऊंट केला गेला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत दमदार कमबॅक केलं. मात्र नीरजने थ्रो करण्यापूर्वी पाकिस्तानच्या अरशद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून इतिहास रचला. हा ऑलिम्पिक इतिहासातील सर्वश्रेष्ठ थ्रो ठरला होता. सुरवातीच्या ३ प्रयत्नात ८९.४५ मीटर हा नीरजचा सर्वोत्तम थ्रो ठरला.
नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले असते, तर ऑलिम्पिक इतिहासात जेतेपद राखणारा तो पाचवा भालाफेकपटू ठरला असता. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत पुरुष भालाफेक करणाऱ्यांमध्ये एरिक लेमिंग (स्वीडन, १९०८ आणि १९१२ ), जॉनी मायरा (फिनलंड १९२० आणि १९२४ ), चोप्राचे आदर्श जॅन झेलेंजी (चेक प्रजासत्ताक, १९९२ आणि १९९६ ) आणि आंद्रियास टी (०४ आणि नॉर्वे) यांचा समावेश आहे.