भारतीय संघाला आधी न्यूझीलंड आणि मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम यादीत स्थान मिळवता आलेले नाही. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आता बीसीसीआय ॲक्शन मोडवर आहे. भारताच्या क्रिकेट संघात शिस्त आणि एकता वाढविण्यासाठी बीसीसीआयने कठोर नियमावली आखली आहे. बीसीसीआयने एकूण १० नियम भारतीय खेळाडूंसाठी आखून दिले
बीसीसीआयने कोणते नियम बनवले?
बीसीसीआयने सर्वच क्रिकेटपटूंसाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणे बंधनकारक केले आहे. सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत इकोसिस्टमशी जोडून ठेवणे हा या गाइडलाइनमागे मुख्य उद्देश आहे. यामुळे उदयोन्मुख क्रिकेटर्सना देशातील टॉप क्रिकेटर्ससोबत खेळण्याची संधी मिळेल. नॅशनल टीमच्या खेळाडूंना यातून सवलत हवी असेल, तर आधीच सिलेक्शन कमिटीला तसे सांगावे लागले.
बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना मॅचपासून ते प्रॅक्टिस सेशन पर्यंत एकत्र प्रवास करणे अनिवार्य केले आहे. काही खास कारण असल्यास स्वतंत्र प्रवास करण्यासाठी हेड कोच, सिलेक्शन कमिटीचे चेअरमनची परवानगी घ्यावी लागेल.
यापुढे दौऱ्यावर जाताना लिमिट बाहेर सामान असल्याने खेळाडूंना स्वत:ला त्याचा खर्च करावा लागेल. बोर्डाच्या गाइडलाइननुसार ३० दिवसापेक्षा जास्तच्या परदेश दौऱ्यासाठी खेळाडू १५० किलो वजन घेऊन जाऊ शकतात. तेच सपोर्ट स्टाफला ८० किलो वजन नेता येईल. ३० दिवसापेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यासाठी १२० किलो वजनी सामान नेण्याची परवानगी असेल. सपोर्ट स्टाफला ६० किलो वजन नेण्याची परवानगी असेल. दुसरा नियम देशांतर्गत मालिकांसाठीही असेल.
आता कुठलाही खेळाडू सीरीज दरम्यान सोबत खासगी स्टाफ उदहारणार्थ शेफ, पर्सनल मॅनेजर, ट्रेनर, सेक्रेटरी किंवा असिस्टेंट घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी बोर्डाची परवानगी लागेल.बंगळुरुमध्ये असलेल्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळाडूंना व्यक्तीगत सामान, उपकरण पाठवण्यासाठी टीम मॅनेजमेंटशी चर्चा करावी लागेल. एक्स्ट्रा खर्च असल्यास स्वत:ला पेमेंट करावे लागेल.सर्व खेळाडूंनी एकत्र प्रवास करणे बंधनकारक असेल. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.कोणतीही मालिका सुरू असेल किंवा संघ परदेश दौऱ्यावर असेल. अशा परिस्थितीत, खेळाडूंना वैयक्तिक जाहिरात शूट करण्याचे किंवा प्रायोजकांसोबत काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल.
BCCI द्वारे आयोजित केलेल्या शूट आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी खेळाडूंना उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामुळे संघाप्रती खेळाडूंची एकजूट वाढण्यास तसेच क्रिकेट खेळाला चालना मिळण्यास मदत होईल.सामना किंवा मालिका संपेपर्यंत सर्व खेळाडूंना एकत्र राहावे लागेल.टीम परदेश दौऱ्यावर ४५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी जात असेल, तर खेळाडूची पत्नी, पार्टनर किंवा कुटुंब त्या दौऱ्यावर फक्त १४ दिवस सोबत राहू शकतात. बीसीसीआय रहाण्याशिवाय त्यांचा दुसरा कुठलाही खर्च करणार नाही.