अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे जमिनीच्या वादातून अल्पवयीन मुलावर लोखंडी गजाने हल्ला करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी (11 एप्रिल) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी (13 एप्रिल) चार संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजनगर, मुकुंदनगर येथे राहणार्या 17 वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. अब्दुलरहिम आबीद शेख, शेख शेरमोहम्मद आबीद (दोघे रा. मुकुंदनगर), शाहनवाज खान सरशेख, शेख जावीद निजाम (दोघे रा. दर्गा दायरा, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या भावाने एक प्लॉट दुसर्याला विकला याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी माझा चुलत भाऊ कोठे आहे याची चौकशी करत मला लोखंडी गजाने मारहाण केली. पाठीवर, उजव्या हातावर आणि डाव्या पायावर गंभीर दुखापत झाली. शिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार डी. व्ही. झरेकर करीत आहेत.