कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)
शहराच्या मध्यवर्ती चौकातील सचिन वॉच कंपनी या घड्याळ दुकानात शनिवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेदरम्यान मोठी चोरी झाली. सुमारे सात ते आठ चोरट्यांनी दुकानातील मौल्यवान घड्याळे व रोख रक्कम मिळून अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
चोरीची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमला पाचारण करण्यात आले असून, तपासाची गती वाढविण्यात आली आहे. दरम्यान, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांशी चर्चा केली. त्यांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, लवकरच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.