• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Monday, June 9, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, ‘राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..’

by Shrirampur Times
June 3, 2024
in महाराष्ट्र
2.9k 88
0
Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, ‘राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..’
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: “जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: “पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण दाबून टाकण्यासाठी सत्ताधारी आणि सरकारी यंत्रणा किती भयंकर प्रताप करीत आहे, हे रोज चव्हाट्यावर येत आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील ‘अप्रत्यक्ष सह-आरोपीं’चे शेपूट आणखी बरेच लांबू शकते, अशी शक्यताही आरोपी डॉक्टरच्या विधानाचा संदर्भ देत ठाकरे गटाने म्हटलं आहे.
आरोपींना वाचविण्याचा आटापिटा करणारी सरकारी-पोलीस यंत्रणा
“पुणे अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी बिल्डर पुत्राच्या रक्ताच्या नमुन्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी फेरफार केल्याचा आणि ते नमुने थेट कचरा कुंडीत फेकून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही. अटकेत असलेल्या डॉ. तावरे याने ‘मी सगळ्यांची नावे जाहीर करीन’ अशी धमकीच दिली आहे. स्वतः आरोपी असलेला डॉ. तावरे एवढ्या खुलेपणाने धमकी देतो म्हणजेच या प्रकरणातील ‘अप्रत्यक्ष सह-आरोपीं’चे शेपूट आणखी बरेच लांबू शकते. असाच या धमकीचा अर्थ आहे. या प्रकरणातील आरोपी असोत, त्यांना वाचविण्याचा आटापिटा करणारी सरकारी-पोलीस यंत्रणा असो की या सगळ्यांचे सत्तेच्या पडद्यामागचे सूत्रधार, ही सगळी मंडळी भ्रष्टच नाहीत, तर ‘रक्तालाही चटावलेली’ आहेत. आरोपीच्या रक्ताचे नमुने कचरा कुंडीत फेकणाऱ्यांना दुसरे काय म्हणणार?” असा घणाघात ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
आरोग्य विभाग भ्रष्टाचार आणि खाबूगिरीच्या आरोपांनी पुरता बदनाम
“पुण्याचे ससून रुग्णालय हे ‘गुन्हेगारांना वाचविणारा अड्डा’ बनले आहे आणि राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचार आणि खाबूगिरीच्या आरोपांनी पुरता बदनाम झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेचे निलंबित आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्याच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली होती. डॉ. पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “नियमबाह्य टेंडर काढण्यास नकार दिल्यानेच आपले निलंबन करण्यात आले आहे. नियमबाह्य टेंडरिंग, खरेदीची कामे आणि इतर कामांसाठी मंत्रीमहोदयांनी आपल्याला कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून आपल्यावर दबाव आणला होता.’’ डॉ. पवार यांनी पत्रात कोणाचा नामोल्लेख केलेला नाही. तथापि, त्यांचा रोख राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडेच आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही
“जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही. अनियमित बदल्या-बढत्या आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल हा आरोग्य विभागातील मोठा उद्योग बनला आहे. महात्मा जोतिराव फुले योजनेतील बेकायदेशीर कामांवरून आरोप झाले. रुग्णवाहिका खरेदीमध्ये 6 हजार कोटींचा घोटाळा, कंत्राटी कामगार भरतीच्या नावाखाली 3200 कोटी रुपयांच्या ‘टेंडर’ची खाबूगिरी, असे आरोग्य खात्याच्या भ्रष्ट कारभाराचे नमुने आतापर्यंत बाहेर आले आहेत. त्यात ससून रुग्णालयातील अमानुष भ्रष्टाचाराची भर पडली,” असं ठाकरे गटाने म्हटलंय.
सरकारलाच आरोपी करा

नक्की वाचा >> Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Shrirampur Times

Shrirampur Times

Related Posts

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा
महाराष्ट्र

संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा

April 14, 2025
“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?
देश

“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?

April 12, 2025
मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी
महाराष्ट्र

मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी

March 31, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.