श्रीरामपूर एमआयडीसी परिसरातील एका फर्निचर कंपनीत भीषण आग लागली आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फर्निचर कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोकडे आणि ओताडे यांनी घटनास्थळी दाखल झाले आहे.