श्रीरामपूर – कोपरगाव रस्त्यावरील खैरीनिमगाव येथील साबळे वस्ती येथे रूग्णवाहिका आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
श्रीरामपूर रोडवर खैरी निमगाव येथील साबळे वस्तीजवळ असलेल्या वळवणावर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर कडून येणारी रूग्णवाहिका (क्रं एमएच 16 डीपी 0385) व दुकाची (एमएच 17 डीडी 8053) यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तुषार भालेराव (राहणार चितळी) याचा जागीच मृत्यू (Death) झाला.
या घटनेनंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश परदेशी यांनी खाजगी रूग्णवाहिकेला संपर्क साधत तुषार भालेराव यास साखर कामगार रूग्णालयात पाठवण्यात आले.