श्रीरामपूर – २०१६ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ११ नगरसेवकांनी एकत्र येत स्वतंत्र गट स्थापन केला होता. या बंडखोरीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. या घटनेनंतर काही वर्षांतच प्रदीर्घ आजाराने जयंत ससाणे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात काँग्रेसमध्ये एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये या बंडखोर नगरसेवकांविषयी अजूनही तीव्र नाराजी आहे.
🔄 पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेशाचा प्रयत्न
आता २०२५ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तेच बंडखोर नगरसेवक पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पक्षाच्या तिकिटासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी हे नेते जयंत ससाणे यांच्या नावे मत माघात फिरताना दिसत आहेत.
🗣️ “गद्दारांना पुन्हा संधी का?”
स्थानिक पातळीवर जनतेत एक वेगळीच कुजबुज सुरू आहे. “तेव्हा गद्दारी केली, आता पुन्हा ससाणेंच्या नावाने मते मागतात? हीच का काँग्रेसची निष्ठा?” अशा शब्दांत लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी सोशल मीडियावर #गद्दारांना_तिकीट_नको असे हॅशटॅगही ट्रेंड होताना दिसत आहेत.
😠 एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. “वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलून बंडखोरांना पुन्हा संधी देणे म्हणजे ससाणेंच्या निष्ठेचा अपमान आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
🕯️ जयंत ससाणे यांचा संघर्षमय प्रवास
जयंत मुरलीधर ससाणे (वय ६०) हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना १९८५ मध्ये नगरसेवक झाले. त्यांनी श्रीरामपूर पालिकेत सत्तांतर घडवून आणले आणि दोन वेळा आमदार, दहा वर्षे नगराध्यक्ष, तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर नगरपालिकेला संत गाडगेबाबा अभियानाचा चार वेळा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने एक संघर्षशील आणि लोकाभिमुख नेता हरपला आहे.
पक्षासाठी निष्ठा ही केवळ शब्दात नव्हे, तर कृतीतही दिसली पाहिजे. २०१६ मधील बंडखोरी विसरून पुन्हा त्याच चेहऱ्यांना संधी देणे, हे काँग्रेसच्या मूल्यांशी सुसंगत आहे का? हा प्रश्न आता जनतेच्या मनात खोलवर रुजत चालला आहे.






