श्रीरामपूर – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज सकाळी अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाण करून नंतर निर्जनस्थळी सोडून देण्यात आले. श्रीरामपूरमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. अपहरण आणि मारहाणीचे कारण आद्याप समजू शकले नाही. काही हिंदुत्ववादी व्यक्तींनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, गुजर आणि काँग्रेस कार्यकर्ते फिर्याद देण्यासाठी पोलिस ठण्यात गेले आहेत.
अपहरणाची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.
सचिन गुजर नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पाडले होते. तेव्हा घरापासून काही अंतरावर एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले. जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर शहरापासून काही अंतरावर निर्जन ठिकाणी सोडून देण्यात आले. त्यांचा मोबाईलही फोडून टाकण्यात आला.






