निकष डावलून जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण जर अपात्र असाल तर तुम्हाला दिलेले पैसे परत सरकारजमा होऊ शकतात. कारण एका महिलेकडून सरकारने 5 महिन्यांचे साडे सात हजार रुपये परत घेतले आहे. धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगण्यात आले. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविलं जाणार आहे. जर कुणाची तक्रार आली तर त्या अर्जाची तपासणी होईल, अन् अपात्र ठरल्यास अर्ज तर बाद होईलच. त्याशिवाय त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या आधी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेसाठी आतापर्यंत अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. लाडकी बहीण योजनामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचे वारंवार समोर आले होते. पण सरकारकडून ही योजना बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले होते. पण पडताळणी केली जाईल, असे सांगण्यात आले होते. ज्यांची तक्रार येईल, त्या अर्जाची पडताळणी केली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आलेले. आता ज्या अर्जाची तक्रार आली, त्याची पडताळणी केली जात आहे. अपात्र ठरल्यास त्यांचा अर्ज बाद होत आहे.
निकषात न बसता योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत, त्याची पडताळणी आता सुरू झाली आहे. राज्यातून अनेकांच्या याबाबत तक्रारी आल्या आहेत, त्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर या जिल्ह्यामधून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. तक्रारी आलेल्या अर्जातील पिवळे आणि केसरी रंगाचे रेशनकार्ड असणाऱ्यांचे अर्ज वगळता सर्व अर्जाची पुन्हा छाननी होणार असल्याचे समजतेय.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरतील?
ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील. ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे. सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत असेल तर..
पात्र कोण ठरणार?
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला. महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.