श्रीरामपूर, प्रभाग क्र. 2 – मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अत्यंत कमी मतांनी पराभूत झालेले मल्लू शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा श्रीरामपूर नगरपालिकेच्या राजकारणात चर्चेत आले आहे. जनतेशी असलेली त्यांची नाळ, सेवाभावी कार्यपद्धती आणि स्पष्ट भूमिका यामुळे प्रभाग क्र. 2 मधील नागरिक त्यांना व्यक्ती म्हणून प्रचंड पाठिंबा देत आहेत.
📌 मागील निवडणुकीत अपक्ष, यंदा पक्षीय पाठिंब्याची शक्यता
मल्लू शिंदे यांनी मागील निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना मिळालेला जनतेचा भरभरून प्रतिसाद आणि अत्यंत कमी मतांनी झालेला पराभव हे त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक ठरले. यंदा मात्र, त्यांच्या कार्यशैलीला आणि जनाधाराला ओळखून काही प्रमुख राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
📌 सोशल मीडियावर भावनिक पोस्टला प्रचंड प्रतिसाद
मल्लू शिंदे यांच्या समर्थकांनी नुकतीच एक भावनिक प्रचार पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. “राजकारण नाही सेवा, समर्पण माझं ध्येय आहे!” या संदेशाने सजलेली ही पोस्ट जनतेच्या मनाला भिडली असून, हजारो नागरिकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. भागातील नागरिकांनी याला दुजारा देत आम्ही मल्लू शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहून अशी ग्वाही दिली
📌 ऑनलाइन मतदानात आघाडी
Strawpoll वर घेण्यात आलेल्या ऑनलाइन मतदानात मल्लू शिंदे हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. या मतदानात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत अनेक सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे मतदान प्रभागातील जनतेच्या मूडचे प्रतिबिंब मानले जात आहे.

📌 सेवा आणि समर्पण हेच बळ
मल्लू शिंदे यांचे राजकारण हे पदासाठी नव्हे तर जनतेच्या सेवेसाठी आहे, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून उभे राहिले आहेत.






