प्रभाग क्र. 2 मध्ये एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामामुळे धोक्यात आलेल्या गरीब कुटुंबांची घरे श्री. मल्लू शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन वाचवली होती. त्या वेळी कोणीही मदतीला नव्हते, पण मल्लू शिंदे यांनी प्रशासनाला थांबवून JCB मागे पाठवली आणि गरिबांचे घर टिकवले.
आज, त्याच कुटुंबांनी मल्लू शिंदे यांची सध्याची परिस्थिती पाहून ₹10,000 चा चेक देऊन निवडणूक खर्चासाठी मदत केली. मदत करताना त्यांनी भावूक होऊन सांगितले:
“तेव्हा कोणी नव्हतं, मल्लू भाऊ होते. रक्ताचं नातं नाही, पण मल्लू भाऊ आमच्या घरचेच आहेत!“
ही घटना मल्लू शिंदे यांच्या जनतेशी असलेल्या नात्याची आणि विश्वासाची साक्ष आहे.
🌟 सामाजिक प्रतिष्ठेच्या उमेदवाराला साथ – सौ. रेखा सूर्यभान शेळके
मल्लू शिंदे यांनी प्रभाग क्र. 2 (अ) साठी एक गरिब, पण प्रतिष्ठित कुटुंबातील महिला उमेदवार सौ. रेखा सूर्यभान शेळके यांना संधी दिली आहे. त्यांचं पार्श्वभूमी प्रभावी आहे:
- श्रीरामपूरचे पहिले नगराध्यक्ष उपाध्ये महाराज यांच्या कमिटीतील सदस्य
- माजी नगरसेवक भागाजी शेळके यांची नातसून
- नगर परिषदेत 40 वर्षे अधिकारी राहिलेले व्ही. बी. शेळके यांची सुनबाई
- मुळा प्रवटा वीज मंडळातील कर्मचारी सुरेश शेळके यांची सुविद्य पत्नी
सौ. रेखा शेळके यांची निवड मल्लू शिंदे यांच्या सामाजिक समतोल आणि नेतृत्वदृष्टीचे उदाहरण ठरते.
🗳️ निवडणूक जनतेच्या हाती – मल्लू शिंदे यांची लोकप्रियता शिखरावर
या घटनांमधून स्पष्ट दिसते की मल्लू शिंदे यांची निवडणूक आता जनतेने स्वतःच्या हाती घेतली आहे. त्यांच्या कार्याची आठवण, जनतेचा विश्वास आणि भावनिक नातं पाहता, मतांचा वर्षाव होणार हे निश्चित आहे.






