नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांना ईव्हीएमच्या कंपार्टमेंटला हार घालणं भोवलं आहे. शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting : EVMला हार घालणं शांतिगिरी महाराजांना चांगलंच महागात पडल आहे. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तहसीलदारांच्या तक्रारीनंतर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत
शांतिगिरी महाराजांसह भगव्या वस्त्रांवर जय बाबाजी असं नाव लिहिल्याने पोलिसांनी शांतिगिरी महाराजांच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांसह मतदान याद्याही जप्त केल्या. यामुळे शांतिगिरी महाराज आणि जय बाबाजी भक्त परिवार देखील आक्रमक झाला. मात्र, भारत मातेबद्दल आदर असल्याने हार घातल्याचं शांतिगिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले
नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे तर अपक्षम म्हणून शांतिगिरी महाराज मैदानात आहेत. मतदानादिवशी तिघांनीही मतदानाचा आपला हक्क बजावला. मतदानानंतर शंभर टक्के आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास गोडसेंनी व्यक्त केला. तर राजाभाऊ वाजेंनीही विजयाचा विश्वासही व्यक्त केला.तर शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर EVM मशीनला हार घातला. नाशिक लोकसभेचे मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भाटवाडी गावात वाजे यांनी मतदान केले. मतदानाला जाण्यापूर्वी वाजेंच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं.यावेळी राजाभाऊंनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मालेगावात त्यांनी मतदान केलं. यावेळी अहिराणी भाषेतून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन दादा भुसेंनी केले.