आपल्या बँकेमध्ये एफडी खऱ्या आहेत की नाही तपासून पहा. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत अनेक एफडी बोगस निघाल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला.
Nashik Crime News : बोगस बियाणांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना बोगस एफडीचा अनुभव आला आहे. नाशिकमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये शेतक-यांचा गोंधळ पहायला मिळाला. एफडी बोगस निघाल्याचा आरोप करत शेतक-यांना गोंधळ घातला. बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगनमताने शेतक-यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. बँकेच्या प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
नाशिक जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून अनेक जणांच्या एफडी बोगस निघाल्यास समोर आले आहे. या बँकेतील कर्मचारी आणि एजंट मिळून अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत काही तक्रारी समोर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये गोंधळ घातला.