• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Monday, June 9, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

by Shrirampur Times
June 3, 2024
in महाराष्ट्र
2.9k 88
0
Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी रविवारी तसेच सोमवारी अटक केल्यानंतर स्थानिक आमदाराचं डिसेंबर महिन्यातील एक पत्र व्हायरल झालं आहे.
Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात वडगावशेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी डॉ. अजय तावरेंसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आता याच पत्रासंदर्भात टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे टिंगरे तेच आमदार आहेत जे 19 मे रोजी कल्याणी नगरमध्ये अपघात झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहचले होते.
हसन मुश्रीफ यांना पत्र
तावरे यांची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी यासाठी टिंगरेंनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना 26 डिसेंबर 2023 रोजी पत्र लिहिलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुरी देत या पत्रावर तावरेंना अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश दिले होते. आता हेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्रामध्ये विषय ‘डॉ. अजय तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरीक्त कार्यभार देणेबाबत’ असा लिहिला आहे.
टिंगरेच्या पत्रात मजकूर काय?
टिंगरेंनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये , “उपरोक्त विषयान्वये माझ्या परिचयाचे डॉ. अजय तावरे हे पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत. यापूर्वी ससून सर्वोपचार रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक पदावर कोविड 19 च्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडलेले आहे. तरी डॉ. अजय तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देणेबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी ही विनंती,” असा मजकूर आहे.
पत्र व्हायरल झाल्यावर टिंगरेचं स्पष्टीकरण
तावरेंना सोमवारी म्हणजेच 27 मे 2024 रोजी अटक झाल्यानंतर टिंगरेंचं हे पत्र चांगलेच व्हायरल झाले. यानंतर सायंकाळी प्रसारमाध्यमांनी टिंगरेंनी एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली. “आज माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते,” असं टिंगरे म्हणाले आहेत.
..म्हणून शिफारस पत्र दिलं

Related Posts

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा
महाराष्ट्र

संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा

April 14, 2025
“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?
देश

“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?

April 12, 2025
मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी
महाराष्ट्र

मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी

March 31, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.