Nashik water shortage issue : नाशिकमधली पाणी टंचाईची परिस्थिती किती भीषण आहे, याचा प्रत्यय देणारा व्हिडीओ पाहा… हंडाभर पाण्यासाठी महिला जीव टांगणीला लावून विहिरीत उतरत आहेत.
Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरंबापाडा (Kharambapada) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. दोरीच्या सहाय्याने (Woman descending into a well) विहिरीत उतरून महिला पाणी भरत आहे. गंभीर बाब म्हणजे गढूळ पाणी मिळत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे खरंबापाडा येथील विहीर कधीही आटत नाही, अशी परिस्थिती असतांना ग्रामपंचयातीच्या कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी विहीरीतील पाण्याचा उपसा केलाय. त्यामुळे गावासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
गाळमिश्रित पाणी मिळत असल्याने पोटाचे विकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन उन्हाळयात ज्या विहीरीवर पिण्याच्या पाण्याची मदार असते, त्याच विहीरीतील पाणी काढून घेतल्याने याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जातेय. पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी केली जाणारी महिलांची धडपड अंगावर काटा आणणारी आहेत.