Who’s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Who’s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या मुलाच्या रक्ताऐवजी नेमकं कोणाचं रक्त घेण्यात आलं होतं याची माहिती समोर आली आहे. तावरेंच्या आदेशानंतर हळनोरने एका महिलेच्या रक्ताचा नमुना घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही काही शिफारशी केल्या आहेत.
कोणाचं रक्त घेतलं?
कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री (26 मे 2024 रोजी) उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नेमका घटनाक्रम सांगितला होता. तावरेच्या सांगण्यावरुन हळनोरने या मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले खरे पण ते नंतर कचऱ्यात फेकून दिले. मात्र त्याऐवजी नेमके कोणाचे रक्त पाठवण्यात आलं होतं यासंदर्भात खुलासा करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील खुलासा आता झाला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने हळनोरने घेतले होते. तसेच अन्य एका महिलेच्या रक्ताचे नमुनेही या अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी घेतले होते. याच महिलेचं रक्त या मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं.
समितीचा अभिप्राय
मेडिको लीगल केस (एमएलसी) प्रकरण हाताळणीसंदर्भात प्रचलित हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल अॅण्ड सिव्हीक मेडिकल कोड (Hospital Administration Manual & Civil Medical code) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा एकत्रित विचार करुन समितीने आपला अभिप्राय व शिफारशी कळवल्या आहेत. या शिफारशी काय आहेत पाहूयात…
समितीने केलेल्या शिफारशी :
2) डॉ. श्रीहरी हळनोर यांनी दिनांक 19 मे 2024 रोजी एमएलसी तपासणी व रक्त नमुने घेताना नियमाचे पालन केलेले दिसत नाही. (चेन ऑफ कस्टडी ऑफ एव्हिडन्स)
2) डॉ. श्रीहरी हळनोर यांनी दिनांक 19 मे 2024 रोजी एमएलसी तपासणी व रक्त नमुने घेताना नियमाचे पालन केलेले दिसत नाही. (चेन ऑफ कस्टडी ऑफ एव्हिडन्स)
3) डॉ. श्रीहरी हरनोल यांनी रक्ताचे नमुन्यांमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने महिला व दोन वयस्कर व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेतले.