• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Sunday, July 20, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ट्रॅफिकला कंटाळून हिंजवडीतून 37 कंपन्यांचं ‘पॅकअप’! पुण्याच्या ट्रॅफिकवर धंगेकरांनी सुचवला रामबाण उपाय

by Shrirampur Times
June 3, 2024
in महाराष्ट्र
2.9k 29
0
ट्रॅफिकला कंटाळून हिंजवडीतून 37 कंपन्यांचं ‘पॅकअप’! पुण्याच्या ट्रॅफिकवर धंगेकरांनी सुचवला रामबाण उपाय
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

37 Componies To Exit Hinjewadi IT Park Ravindra Dhangekar React: रविंद्र धंगेकरांनी या विषयासंदर्भात बोलताना वाहतूक कोंडी का होते? यामागील नेमकी कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करतानाच उपायही सुचवला आहे.
37 Componies To Exit Hinjewadi IT Park Ravindra Dhangekar React: पुण्याला आयटी हब अशी नवी ओळख मिळवून देणाऱ्या हिंजवडीमधून 37 कंपन्या लवकरच बाहेर पडणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. वाहतूककोंडीला कंटाळून या कंपन्यांनी आपला तळ हालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेले असतानाच काँग्रेसचे पुण्यातील नेते तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी या विषयावर पहिली प्रतिक्रिया आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नोंदवली आहे. “हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे,” असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.
त्याचेच हे परिणाम
धंगेकर यांनी आपलं म्हणणं मांडताना, “एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं! गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केले नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत,” असं म्हटलं आहे.
वाहतूक कोंडी का होते? धंगेकरांनी सांगितलं कारण
“कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन – दोन तास लागायला लागलेत तर ऑफिस मधून घरी येताना सुद्धा दोन-तीन तासांचा प्रवास होतोय. महापालिकेकडून पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी काम करण्याचं आव आणून नको त्या गोष्टींवरती पैसे खर्च करण्यात आले आहेत,” असं धंगेकरांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “महत्त्वाचे चौक, मोठे जंक्शन या ठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेप्रेटर टाकून वाहतूक कोंडी कमी करता आली असती. मात्र कोणीही या गोष्टींकडे पुढच्या 40-50 वर्षांचे नियोजन म्हणून पाहत नाही,” असं म्हणत धंगेकरांनी शहर नियोजन विकासाचा आभाव असल्याचं अधोरेखित केलं आहे.
पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर..
“पोलिसांच्या वाहतूक विभागाचे देखील यात अक्षम्य दुर्लक्ष होतंय. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्करची गर्दी रस्त्यावर असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस, वॉर्डन उपस्थित राहिलेच पाहिजे. सदर बाबतीत जर पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले उद्योगमंत्री यांनी योग्य ती पाऊले उचलावीत,” असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.
युद्ध पातळीवर उपाययोजना

“पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत युद्ध पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असंही धंगेकरांनी या पोस्ट सोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.

Shrirampur Times

Shrirampur Times

Related Posts

ऐतिहासिक क्षण! २० वर्षांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे अखेर एकत्र
महाराष्ट्र

ऐतिहासिक क्षण! २० वर्षांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे अखेर एकत्र

July 5, 2025
मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा
महाराष्ट्र

संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा

April 14, 2025
“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?
देश

“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?

April 12, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.