महाराष्ट्रातून दुसऱ्या मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नारायण राणे तसेच भागवत कराड याना एनडीए सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील तब्बल 20 मंत्री पराभूत झाले आहेत. मात्र, राज्यात भाजपची वाताहत झाली असताना नारायण राणे यांनी विजय खेचून आणला होता. दुसरीकडे, भाजपकडून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांनीही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. हे माजी मुख्यमंत्रीही नव्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात मात्र, त्यांना अजून फोन गेलेला नाही.
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले भाजप नेते अनुराग ठाकूरही एनडीए सरकारमध्ये दिसणार नाहीत. अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सतपाल सिंह रायजादा यांचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला आहे. यापूर्वीही त्यांनी या जागेवर निवडणूक जिंकली आहे. त्यामुळेच अनुराग ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात होते.
आतापर्यंत कोणत्या नेत्यांचे फोन आले?
- डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी)
- किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी)
- अर्जुन राम मेघवाल (भाजप)
- सर्बानंद सोनोवाल (भाजप)
- अमित शहा (भाजप)
- कमलजीत सेहरावत (भाजप)
- धर्मेंद्र प्रधान प्रधान (भाजप)
- मनोहर लाल खट्टर (भाजप)
- नितीन गडकरी (भाजप)
- राजनाथ सिंह (भाजप)
- पियुष गोयल (भाजप)
- ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप)
- शंतनू ठाकूर (भाजप)
- रक्षा खडसे (भाजप)
- राव इंद्रजित सिंग (भाजप)
- सुरेश गोपी (भाजप)
- कीर्तिवर्धन सिंग (भाजप)
- मनसुख मांडविया (भाजप)
- डॉ जितेंद्र सिंग (भाजप)
- जुआल ओरम (भाजप)
- गिरीराज सिंह (भाजप)
- हरदीप सिंग पुरी (भाजप)
- जी किशन रेड्डी (भाजप)
- बंदी संजय किशोर (भाजप)
- भगीरथ चौधरी (भाजप)
- सीआर पाटील (भाजप)
- प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
- एचडी कुमारस्वामी (जेडीएस)
- चिराग पासवान (लोजप-आर)
- जयंत चौधरी (RLD)
- अनुप्रिया पटेल (अपना दल)
- जीतन राम मांझी (HAM)
- रामदास आठवले (आरपीआय)
दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र यांसारखी महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्कृतीसारख्या भक्कम वैचारिक बाबी असलेल्या दोन मंत्रालयांची कमानही भाजप खासदारांकडे जाऊ शकते. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे मिळू शकतात, असे मानले जात आहे.






