• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Sunday, May 11, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home देश

मोदी सकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ‘ही’ खाती, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं

by Shrirampur Times
June 11, 2024
in देश, महाराष्ट्र
2.9k 29
0
मोदी सकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ‘ही’ खाती, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

 मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आता खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment)  करण्यात आलं आहे. मोदी 3.0 मंत्रीमंडळात भाजपच्या 25 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर 5 मित्र पक्षांचे मंत्री आहेत. सभाजपाचे दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय (Union Ministry of Road Transport) सोपवण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत उत्तराखंडचे अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांच्याकडे परिवहन राज्य मंत्रीपद देण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे नितीन गडकरी यांच्या परिवहन खात्यातील कामकाजावर पंतप्रधान मोदी समाधानी असल्याचं स्पष्ट होतंय.

नितीन गडकरी यांचं कार्य
नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. Infrastructure man म्हणून त्यांची ओळख आहे. युती सरकारच्या काळात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई उड्डाण पुल वेगाने बनवले. राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या जवळ असलेले नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विकासाचा महामेरू, विकसाचा अग्रगणी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. खासदार झाल्यापासून त्यांनी नागपूरचा चेहरा मोहरा बदलला. नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आलेत.

भाजपचे पियुष गोयल यांच्याकडे उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. . मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकडून त्यांनी यंदा विजय मिळवला. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. तर रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा आणि युवा विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव आयुष मंत्रालय देण्यात आलं आहे. तर रामदास आठवलेयांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. 

पियुष गोयल
पियुष गोयल यांचा जन्म 13 जून 1964 साली मुंबईत झाला. त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल हे माजी केंद्रीय मंत्री होते. तर त्यांच्या आईचे नाव चंद्रकांता गोयल असून त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सलग तीन वेळा सदस्य होत्या.  पियुष गोयल हे लोकसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी राज्यसभेचे सदस्य होते. 2017 ते 2019 या काळात त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय ही दोन खाती त्यांच्याकडे होती. 2018 आणि 19 ला त्यांच्याकडे अर्थ आणि कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता. 2014 ते 17 या कालखंडात त्यांच्याकडे विद्युत, कोळसा आणि नवीकरणीय ऊर्जा अशी मंत्रालय त्यांनी सांभाळली आहेत. पियुष गोयल यांच्या 2018 ते 19 या कालखंडात भारतीय रेल्वेने सर्वोत्तम सुरक्षा रेकॉर्ड मिळवला आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकडून त्यांनी यंदा विजय मिळवला.

प्रतापराव जाधव
प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर इथं झाला. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. मेहकर तालुक्यातूनच राजकारणाला सुरुवात झाली
1995 मध्ये पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले, त्यानंतर 1999 मध्ये दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले तर 2004 तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला. 2024 मध्ये बुलडाणा  मतदारसंघातून त्यांनी थेट लोकसभा निवडणूक जिंकली.  शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांनी आता केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलीय. 

रक्षा खडसे 
भाजपाच्या युवा नेत्या रक्षा खडसे 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. कोथळी गावातून सरपंच पद आणि नंतर जिल्हा परिषद सदस्या पासून राजकारणात त्यांनी सुरुवात केली. सर्वात तरुण सदस्य (26 वर्ष) म्हणून खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. 2019 मध्ये साडेतीन लाख मतांनी त्यांनी मनीष जैन यांचा पराभव केला होता. तिसऱ्यांदा खासदार होण्याचा बहुमान त्यांनी मिळवलाय. यंदाही रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून आल्यात.

रामदास आठवले
रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. रामदास आठवले यांचा जन्म 25 डिसेंबर 1959 रोजी सांगली जिल्ह्यातील ढालेवाडी इथं झाला. रामदास आठवले संपर्क नामदेव ढसाळ, राजा ढाले या नेत्यांशी झाला आणि ते दलित चळवळीत सक्रिय झाले. रामदास आठवले हे दलित पॅंथर संघटनेचे कार्यकर्ते होते, याच चळवळीतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 10 एप्रिल 1978 ला भारतीय दलित पॅंथर ची स्थापना झाली. रामदास आठवले त्या संघटनेचे प्रमुख संघटक याच काळात त्यांनी दलित पॅंथर संपूर्ण देशभर पसरवली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात रामदास आठवले हे अग्रस्थानी होते. 1999 ला ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून संदिपान थोरात या सलग सात वेळा खासदार असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून जिंकले. 5 जुलै 2016 रोजी त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचे खात होतं.

मुरलीधर मोहोळ
मुरलीधर मोहोळ हे वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. 1996 मध्ये त्यांनी भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2006 मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे बंधू दिवंगत नगरसेवक सुबराव कदम यांच्या पत्नी सुशीला कदम यांचा पराभव करून जायंट किलर ठरले.  स्थायी समिती अध्यक्ष आणि नंतर महापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.  2024 लोकसभा निवडणुकीत, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाची मर्जी संपादन करण्यात यश. पुण्यातून लोकसभेची उमेदवारी आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत खासदार म्हणून दिल्लीत पोहोचलेत.

Shrirampur Times

Shrirampur Times

Related Posts

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला
देश

चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला

May 6, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
मोठी बातमी! भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं
देश

मोठी बातमी! भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं

April 29, 2025
 “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांचे मोठे विधान
देश

 “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांचे मोठे विधान

April 26, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.