• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Monday, May 12, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर मोफत; ‘या’ महिलांना मिळणार लाभ

by Avinash Shinde
July 31, 2024
in महाराष्ट्र
2.9k 29
0
आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर मोफत; ‘या’ महिलांना मिळणार लाभ
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून ‘माझी लाडकी बहीण योजने’साठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक साहाय्याबासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर देखील मोफत देण्यात येणार आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात आज शासन निर्णय निर्गमित झाला असून राज्यातील गोर गरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.

देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटूंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-२०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. महाराष्ट्रात सद्यःस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅसजोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच, एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे, परिणामी ते वृक्षतोड करुन पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली होती.

सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याची देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असणार आहे. एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार असून सदर लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब कुटुंबांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.

Avinash Shinde

Avinash Shinde

Related Posts

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा
महाराष्ट्र

संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा

April 14, 2025
“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?
देश

“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?

April 12, 2025
मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी
महाराष्ट्र

मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी

March 31, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.