• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Sunday, June 1, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा; म्हणाले, “आमचा मुलगा…”

by Avinash Shinde
August 22, 2024
in महाराष्ट्र
2.9k 29
0
बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा; म्हणाले, “आमचा मुलगा…”

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 82

980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

बदलापुरातील एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे या नराधमाने दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक (Arrested) करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे ही मागणी करत मुलींच्या पालकांसह बदलापूरकरांनी आंदोलन केले. मात्र, आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. या घटनेला चोवीस तास उलटताच आता अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आई वडिलांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अक्षय शिंदेचे आई-वडील (Parents) म्हणाले की, “दोन लहान चिमुकलींसोबत अक्षय शिंदेने जे काही केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तसला कुठला प्रकार घडलाच नाही. अक्षयला फसवले जात आहे.अक्षयचे काम बाथरुमच्या सफाइचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार, असा सवाल अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे.तसेच, अक्षयची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच आमच्या घरात लोक शिरले, आम्हाला मारहाण (Beating) करण्यात आली आणि घराबाहेर ढकलून दिले. तुम्ही इथे राहूच नका असे आम्हाला सांगितले. आमचं कुणी काही ऐकूनच घेतले नाही, असे आरोपी अक्षयचे आई-वडील म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

नेमकी घटना काय घडली?

बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य केले. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी वेगळाच दावा केला आहे.

Avinash Shinde

Avinash Shinde

Related Posts

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा
महाराष्ट्र

संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा

April 14, 2025
“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?
देश

“हात जोडून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं…”; अमित शाहांचे विधान, नेमकं काय म्हणाले?

April 12, 2025
मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी
महाराष्ट्र

मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी

March 31, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.