बीडच्या गुंडगिरी आणि दहशत संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनलेली असताना बीडच्या जिल्हा कारागृहातून मोठी बातमी समोर येतेय. बीडमध्ये दोन गटात राडा झाला असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले होते. याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी आहेत. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. (Beed Jail Rada) परळीच्या गोळीबार घटनेत फरार आरोपी बबन गीते याच्या समर्थक कैदी विरोधी गटातील कैद्यांना भिडल्याने कारागृहातच या दोन्ही गटात राडा झाला. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपीही याच कारागृहात असताना हा राडा झाला.
नक्की घडले काय?
बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या गटांमध्ये अचानक वाद झाला आणि काही वेळातच तो हातघाईवर आला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवत मारामारी केली. हा प्रकार घडताच तुरुंगातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला असला मारामारीमागचे नेमके कारण काय होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या दोन गटांमध्ये कोणते कैदी सामील होते, याबाबतही स्पष्टता नाही. बीडमध्ये दोन गटात हाणामारी झाली असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले होते. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वीही तुरुंगात अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.जेलमधील VIP ट्रीटमेंटही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असताना हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारागृहातील राडा प्रकरण समोर आल्याने पुन्हा एकदा बीडकडे लक्ष केंद्रीत झाले आहे.
सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर
सांगली जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा ओढताना तिघे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे आणि सम्मेद संजय सावळवाडे अशी तीन न्यायालयीन बंदींची नावे आहेत. याप्रकरणी कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली.