• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Tuesday, July 1, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home अ. नगर

नगरसाठी चार दिवस पावसाचा यलो अलर्ट

by Shrirampur Times
June 3, 2024
in अ. नगर, श्रीरामपूर
2.9k 29
0
नगरसाठी चार दिवस पावसाचा यलो अलर्ट
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

मान्सूनची वेगवान वाटचाल सुरू असताना नगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्यावतीने 6 जूनपर्यंत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजामध्ये नगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल जाणवत असून पावसापूर्वीची चाहूल लागलेली दिसत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असून कृषी विभागाने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला दिला आहे.

देशात मान्सूनची वाटचाल दमदार पध्दतीने सुरू आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडूपर्यंत मान्सून येऊन ठेपला असून येत्या आठ दिवसांत राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्यात विशेष करून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी व्यक्त केलेल्या अंदाजात नगर जिल्ह्यात येत्या 6 जूनपर्यंत म्हणजे पुढील चार दिवस पावसाचा यलो अर्लट देण्यात आलेला आहे.

दुसरीकडे दिवसभराच्या उन्हाच्या चटक्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सांयकाळी ढगांची दाटी होतांना दिसत असून दमट हवामान होतांना दिसत आहे. ही पावसाची चाहूल असल्याचे जुने जाणकार यांचे म्हणणे असून येत्या 10 जूननंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

Shrirampur Times

Shrirampur Times

Related Posts

श्रीरामपुरात गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर छापा
श्रीरामपूर

श्रीरामपुरात गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर छापा

June 28, 2025
आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
अ. नगर

आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले

June 26, 2025
बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल
श्रीरामपूर

बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल

June 23, 2025
नगर जिल्ह्यात वादळी पावसात आतापर्यंत 7 जणांचे बळी 
अ. नगर

नगर जिल्ह्यात वादळी पावसात आतापर्यंत 7 जणांचे बळी 

June 16, 2025
बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला
श्रीरामपूर

बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला

June 11, 2025
गोंधवणी रोडवर तरुणाकडून हवेत गोळीबार
श्रीरामपूर

गोंधवणी रोडवर तरुणाकडून हवेत गोळीबार

June 7, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.