• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Monday, June 30, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home श्रीरामपूर

शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा

by Avinash Shinde
July 29, 2024
in श्रीरामपूर
2.9k 29
0
शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 82

980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर जिल्हयातील श्रीरामपूर, नेवासा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून बैठका सुरू झाल्या आहेत. दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रभारी म्हणून उल्हासनगरचे माजी महापौर राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती केली आहे. चौधरी यांच्या कुटुंबातील पाच जण सध्या नगरसेवक आहेत. तसेच श्रीरामपूर विधासभेच्या निवडणूक निरीक्षक पदाची जबाबदारी राजू वाघमारे यांच्यावर सोपवली आहे.

शिंदे गटात येण्यापूर्वी वाघमारे यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच ते मूळ संगमनेरचे असल्याने त्यांचा या जिल्ह्याशी संपर्क राहिलेला आहे. नेवासा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी जेरी डेविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेविड हे ठाण्याचे नगरसेवक असून मुख्यमंत्री शिंदे यांचे ते खास समजले जातात. या अनुषंगाने राजू वाघमारे यांनी श्रीरामपुरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बूथ प्रमुख, गटप्रमुख, गण प्रमुख आदींच्या नेमणुका त्वरित करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, नेवासा मतदारसंघात गतवेळी आ. शंकरराव गडाख यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्याबदल्यात त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. आता गडाख कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवितात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यात आता या मतदारसंघाकडे शिंदे गटाने मोर्चा वळविला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण? याबाबतही उत्सुकता आहे. तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावरही या गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. तेही इच्छुक असून अन्य काहींनीही या गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघात प्रथमच शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. एखादा तगडा उमेदवार हाती लागतो का? यासाठीही या गटाने प्रयत्न सुरू केले आहेत.

Avinash Shinde

Avinash Shinde

Related Posts

श्रीरामपुरात गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर छापा
श्रीरामपूर

श्रीरामपुरात गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर छापा

June 28, 2025
बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल
श्रीरामपूर

बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल

June 23, 2025
बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला
श्रीरामपूर

बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला

June 11, 2025
गोंधवणी रोडवर तरुणाकडून हवेत गोळीबार
श्रीरामपूर

गोंधवणी रोडवर तरुणाकडून हवेत गोळीबार

June 7, 2025
अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूरसाठी कटिबद्ध
श्रीरामपूर

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूरसाठी कटिबद्ध

April 22, 2025
श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले
श्रीरामपूर

श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले

April 10, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.